March 29, 2024

Yaa Goshtincha Vichar Kara: Think on These Things


Price: ₹250.00
(as of Apr 30,2022 01:28:01 UTC – Details)


From the Publisher

Yaa Goshtincha Vichar Kara by J. Krishnamurti

Yaa Goshtincha Vichar Kara Yaa Goshtincha Vichar Kara

प्रश्नकर्ता : प्रज्ञा म्हणजे काय ?

कृष्णमूर्ती : प्रज्ञा म्हणजे काय? प्रज्ञेच्या व्याख्येनेच पुष्कळशा लोकांचे समाधान होते, ‘‘हे फार चांगले स्पष्टीकरण आहे’’ असे तरी ते म्हणतात किंवा ते स्वत:चेच स्पष्टीकरण मान्य करतात आणि जे मन स्पष्टीकरणाने समाधान पावते ते फार उथळ असते आणि म्हणूनच ते प्रज्ञावंत नसते.

प्रज्ञावंत मन हे स्पष्टीकरण व निष्कर्ष यांनी समाधान पावणारे मन नसते, हे तुमच्या लक्षात येऊ लागले आहे. त्याचप्रमाणे ते मन श्रद्धाळूही नसते; कारण श्रद्धा म्हणजे एक प्रकारचा निष्कर्षच असतो. प्रज्ञावंत, सुज्ञ, शहाणे मन हे चौकस मन असते. ते निरीक्षण करणारे, शिकणारे, अभ्यास करणारे मन असते. याचा अर्थ काय? म्हणजे असे, की तुम्ही जेव्हा निर्भय असता आणि ईश्वर म्हणजे काय हे शोधण्यासाठी किंवा कोणत्याही गोष्टीतील सत्य हुडकून काढण्यासाठी तुम्ही बंड करून संपूर्ण समाजाच्या पठडीविरुद्ध उभे राहण्यास तयार होता, तेव्हाच प्रज्ञेचे अस्तित्व असते.

ज्ञान म्हणजे प्रज्ञा नव्हे. जगातील सारी पुस्तके वाचू शकलात तरी त्यामुळे तुम्हांला प्रज्ञा मिळणार नाही. प्रज्ञा ही एक सूक्ष्म, तरल गोष्ट असते. ती कशाशीही जखडलेली नसते. तुम्ही जेव्हा तुमच्या मनाची संपूर्ण प्रक्रिया समजून घेता, एखादा तत्त्वज्ञ किंवा शिक्षक मनाबद्दल काय म्हणतो ते ‘प्रमाण’ मानून नव्हे, तर तुमच्या स्वत:च्या मनाची प्रक्रिया समजून घेता, तेव्हा प्रज्ञा उदयास येते. तुमचे मन हा संपूर्ण मानवजातीचा परिपाक आहे आणि जेव्हा तुम्हांला तुमच्या मनाचा बोध होतो तेव्हा तुम्हांला एकही पुस्तक वाचावे लागत नाही; कारण भूतकाळातील सर्व ज्ञान या मनात असते. स्वत:ला समजून घेत असताना प्रज्ञा अस्तित्वात येते आणि जगातील लोकांशी, वस्तूंशी व कल्पनांशी तुमचा जो संबंध आहे त्यातूनच तुम्ही स्वत:ला समजून घेऊ शकता. एखादी विद्या अवगत करावी त्याप्रमाणे प्रज्ञा ही प्राप्त करावयाची वस्तूच नव्हे. जेव्हा अंतरंगात प्रचंड क्रांती होते, जेव्हा भीती अजिबात नसते तेव्हाच ती प्रज्ञा उदयास येते. याचाच अर्थ, जेव्हा प्रेमभावना असते तेव्हा प्रज्ञा असते; कारण प्रीती ही निर्भय असते.

तुम्हाला जर केवळ स्पष्टीकरणेच हवी असली तर ‘मी तुमच्या प्रश्नाला उत्तर दिले नाही’, असे तुम्हांला वाटेल. ‘प्रज्ञा म्हणजे काय?’ हे विचारणे हे ‘जीवन म्हणजे काय?’ असे विचारण्यासारखे आहे. जीवन म्हणजे अभ्यास, क्रीडा, विषयोपभोग, काम, भांडणे, हेवा, महत्त्वाकांक्षा, प्रेम, सौंदर्य, सत्य- जीवन म्हणजे सर्व काही असते, होय की नाही? पण असे पाहा, हा शोध सतत सुसंगतपणे आणि तळमळीने चालू ठेवण्याइतका धीर आपल्यापैकी पुष्कळांना नसतो.

‘शतकातील सर्वोत्कृष्ट शंभर धार्मिक पुस्तकांपैकी एक’ म्हणून पॅराबोला मासिकाच्या वतीने निवडण्यात आलेले हे पुस्तक आहे. युवक आणि प्रौढांना कृष्णमूर्ती यांच्या शिकवणीची यात उत्कृष्टपणे ओळख करून देण्यात आली आहे.

कृष्णमूर्ती यांची प्रवचने तसेच त्यांनी भारतातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी केलेल्या चर्चेचा समावेश असलेले हे पुस्तक जगातील सर्व प्रमुख भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. माणसाच्या आयुष्यातील वैयक्तिक उद्देशाच्या सफलतेशिवाय वेगळा असा शिक्षणाचा उपयोग असू शकत नाही, हे निर्विवाद सत्य कृष्णमूर्ती यांनी इथे स्पष्ट करून सांगितले आहे.

‘देवता, सत्य किंवा देव यावर विश्वास आणि श्रद्धा ठेवण्याची ऊर्जा निर्माण करणे हे शिक्षणाचे कार्य आहे. त्यातूनच वैयक्तिकरीत्या चांगल्या व्यक्ती आणि पर्यायाने आदर्श नागरिक घडत असतात. आपल्या प्रवाहाला वळण देण्यासाठी नदीला दोन किनारे असतात. त्याचप्रमाणे शिक्षणामुळे निर्माण होणारी ऊर्जा जीवनातील सत्य जोपासण्यासाठी अविचल स्वयंशिस्त निर्माण करते. शेवटी नदी सागराचा शोध घेऊन त्यात विलीन होते. त्याप्रमाणे ही ऊर्जा आपले स्वातंत्र्य मिळवते.’

‘देवाचा शोध घेणे ही देखील आपली अडचण आहे कारण तोच आपल्या जीवनाचा मूलभूत पाया आहे. पायाच पक्का नसेल तर त्यावरील घर दीर्घकाळ तग धरू शकणार नाही. त्याचप्रमाणे देव किंवा सत्य काय आहे. हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही तर सर्व काही असूनही आपले जीवन निरर्थक बनते.

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt Ltd; Fourth edition (1 January 2016); Saket Prakashan Pvt Ltd
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 256 pages
ISBN-10 ‏ : ‎ 8177864378
ISBN-13 ‏ : ‎ 978-8177864373
Item Weight ‏ : ‎ 100 g
Dimensions ‏ : ‎ 20.8 x 13.8 x 1.4 cm
Importer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India Phone : 9881745605
Packer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India Phone : 9881745605

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *